इस्लामाबाद

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इस्लामाबाद

इस्लामाबाद (उर्दू: اسلام آباد) ही दक्षिण आशियामधील पाकिस्तान देशाची राजधानी व एक मोठे शहर आहे. इस्लामाबाद पाकिस्तानच्या उत्तर भागात रावळपिंडीच्या उत्तरेस वसवले गेले असून ते लाहोरच्या २९५ किमी वायव्येस, पेशावरच्या १८० किमी पूर्वेस तर श्रीनगरच्या ३०० किमी नैऋत्येस स्थित आहे.

१९४७ साली भारत व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीस पाकिस्तानची राजधानी कराची येथे होती. नव्या राजधानीसाठी पाकिस्तान सरकारने लष्कराचा प्रमुख तळ असलेल्या रावळपिंडीजवळची एक जागा निवडली व १९६० साली इस्लामाबाद शहर तेथे वसवण्यास सुरुवात झाली. १९६६ साली पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला हलवण्यात आली. सध्या इस्लामाबाद पाकिस्तानमधील एक आघाडीचे व प्रगत शहर आहे. फैजल मशीद ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी तर जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी मशीद येथेच स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →