मॅंचेस्टर (इंग्लिश: Manchester) हे इंग्लंड देशामधील महानगरी बरो व एक प्रमुख शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या मध्य-उत्तर भागात वसले असून ते ग्रेटर लंडन खालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.
१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले मॅंचेस्टर औद्योगिक क्रांतीदरम्यान जगातील पहिले औद्योगिक शहर बनले. येथील वस्त्र निर्माण उद्योग जगातील सर्वात मोठा होता. लिव्हरपूल ते मॅंचेस्टर ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक रेल्वे सेवा होती व मॅंचेस्टर येथे जगातील पहिले रेल्वे स्थानक बांधले गेले होते. इ.स. १८९४ मध्ये बांधल्या गेलेल्या मॅंचेस्टर कालव्याद्वारे मॅंचेस्टर आयरिश समुद्रासोबत जोडले गेले ज्यामुळे येथील उद्योगास अधिकच चालना मिळाली.
सध्या मॅंचेस्टर हे इंग्लंडमधील एक प्रगत शहर असून येथील संगीत, वास्तूशास्त्र, खेळ इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे राहणारे १४.४ टक्के लोक दक्षिण आशियाई वंशाच्या आहेत.
मँचेस्टर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.