लिस्बन (पोर्तुगीज: Lisboã; लिस्बोआ) ही पोर्तुगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या व ताहो नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे ५.४७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३० लाख होती. युरोपियन संघामधील ११व्या क्रमांकाचे मोठे महानगर असलेल्या व ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७ टक्के लोकवस्ती एकवटली आहे.
लिस्बन हे पोर्तुगालचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९४ साली लिस्बन युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती.
लिस्बन
थोडक्यात पण महत्त्वाचे.