कुइंब्रा (पोर्तुगीज: Coimbra) हे पोर्तुगाल देशामधील एक शहर आहे. हे शहर पोर्तुगालच्या मध्य भागात मोंदेगू नदीच्या काठावर वसले असून २०११ येथील लोकसंख्या सुमारे १.५ लाख होती. लोकसंख्येच्या बाबतीत कुइंब्राचा पोर्तुगालमध्ये लिस्बन व पोर्तोखालोखाल तिसरा क्रमांक आहे.
कुइंब्रा येथील ऐतिहासिक विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. इ.स. १५३७ साली स्थापन झालेले येथील कुइंब्रा विद्यापीठ पोर्तुगालमधील सर्वात जुने तर युरोपातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. तसेच पोर्तुगालमधील प्राचीन शहरांपैकी एक असलेले कुइंब्रा ११३१ ते १२५५ दरम्यान पोर्तुगालच्या राजधानीचे शहर होते.
कुइंब्रा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.