मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मँचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८८० मध्ये 'सेंट मार्क्स' नावाने स्थापन झालेला हा क्लब १८९४ मध्ये 'मँचेस्टर सिटी' नावाने ओळखला जाऊ लागला. हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमध्ये खेळतो.
१९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस या क्लबने विविध विजेतेपदे मिळवून यश संपादन केले; परंतु त्यानंतरच्या काळात मँचेस्टर सिटीची कामगिरी घसरली. २००८ मध्ये हा क्लब 'अबू धाबी युनायटेड ग्रुप'ने विकत घेतला व संघात दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. यानंतर मँचेस्टर सिटीची वाटचाल जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब्समध्ये झाली. २०११ मध्ये मँचेस्टर सिटीने एफ.ए. कप जिंकला आणि युएफा चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवली. २०१२ मध्ये मँचेस्टर सिटीने १९६८ नंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला. पुढे पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२-२३ मध्ये क्लबने युएफा चॅम्पियन्स लीगसह 'ट्रेबल' (एकाच हंगामात तीन प्रमुख विजेतेपदे) जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.
मँचेस्टर सिटी एफ.सी.
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.