लेस्टर सिटी एफ.सी.

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लेस्टर सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Leicester City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८२ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो. जमैकन फुटबॉल खेळाडू वेस मॉर्गन हा २०१२ सालापासून लेस्टर सिटीचा कर्णधार आहे.

२०१५-१६ सालचा प्रीमियर लीग हंगाम जिंकून लेस्टर सिटीने खळबळ माजवली. त्यांचा हा विजय इंग्लिश क्रीडाजगतातील सर्वात आश्चर्यकारक विजयांपैकी एक मानला जातो. हंगाम सुरू होण्यापूर्वी लेस्टर सिटीला विजेतेपद मिळण्याची शक्यता ५०००:१ इतकी कमी वर्तवण्यात आली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →