प्रीमियर लीग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

प्रीमियर लीग

प्रीमियर लीग (इंग्लिश: Premier League) आंतरराष्ट्रीय नाव इंग्लिश प्रीमियर लीग ही इंग्लंड देशातील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. इंग्लंडमधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग जगातील सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धांपैकी एक समजली जाते. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये इंग्लंड व वेल्समधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर फुटबॉल लीग चॅंपियनशिपमधील सर्वोत्तम ३ संघांना प्रीमियर लीगमध्ये बढती मिळते. सध्या २१२ देशांमध्ये प्रसारण होणारी प्रीमियर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा आहे.

१९९२ मधील स्थापनेपासून आजवर एकूण ४८ क्लबांनी प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु मॅंचेस्टर युनायटेड (१३), चेल्सी (४), आर्सेनल (३), मॅंचेस्टर सिटी (२), ब्लॅकबर्न रोव्हर्स (१) व लेस्टर सिटी (१) ह्या केवळ ६ संघांनी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →