मक्का-मदीना द्रुतगती रेल्वे किंवा हरमैन द्रुतगती रेल्वे (अरबी: قطار الحرمين السريع) हा सौदी अरेबिया देशामधील एकमेव द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. ४५३ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग इस्लाम धर्मामधील दोन सर्वात पवित्र स्थळे - मक्का व मदीना ह्यांना जोडतो. ह्या मार्गाचा एक छोटा फाटा जेद्दाहमधील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील जोडतो. दरवर्षी हाज यात्रेला येणारे सुमारे ६ कोटी भाविक ही रेल्वे वापरतील असा अंदाज आहे. ह्या रेल्वेमुळे मक्का-मदीना दरम्यानच्या रस्तेवाहतूकीवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.
२००९ साली ह्या द्रुतगती मार्गाचे काम् सुरू झाले व २५ सप्टेंबर २०१८ रोजी ह्या मार्गावरील पहिली गाडी धावली. ३०० किमी/तास इतका कमाल वेग असलेल्या ह्या मार्गाच्या बांधकमासाठी चिनी, फ्रेंच व स्पॅनिश कंपन्यांची मदत घेण्यात आली.
हरामैन द्रुतगती रेल्वे
या विषयातील रहस्ये उलगडा.