मक्का (अरबी: مكة) हे सौदी अरेबिया देशातील मक्का प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर आहे. इस्लाम धर्माचा संस्थापक मुहंमद पैगंबर ह्याचे जन्मस्थान असलेले मक्का इस्लाम धर्मामधील सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. दरवर्षी हज यात्रेच्या निमित्ताने मक्केला कोट्यावधी मुस्लिम भेट देतात. कुराणानुसार आयुष्यात एकदा तरी हज यात्रेदरम्यान येथील अल-हरम मशीदीमधील काबा ह्या वास्तूचे दर्शन घेणे प्रत्येक मुस्लिम धर्मीय व्यक्तीसाठी बंधनकारक मानले जाते.
मक्का शहर जेद्दाह पासून ७० किमी अंतरावर स्थित असून २०१५ साली येथील लोकसंख्या सुमारे १६ लाख इतकी होती. मक्का शहर जेद्दाह येथील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच मदीना ह्या इस्लामधील दुसऱ्या क्रमांकाच्या पवित्र शहरासोबत ४५३ किमी लांबीच्या द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे.
मक्का
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.