किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك عبدالعزيز الدولي) (आहसंवि: JED, आप्रविको: OEJN) हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहराजवळील विमानतळ आहे. सौदी अरेबियाचा भूतपूर्व राजा अब्दुल अजीज अल-सौद ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. हा आकाराने सौदी अरेबियामधील तिसऱ्या क्रमांकाचा तर प्रवासी संख्येमध्ये सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. मुस्लिम धर्मीयांचे मक्का हे तीर्थक्षेत्र येथून जवळ असल्याने अब्दुल अजीज विमानतळावर हज यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी ८०,००० क्षमतेचे वेगळे टर्मिनल बांधण्यात आले आहे. मक्का व मदीना शहरांना जोडणारा ४५३ किमी लांबीचा मक्का-मदीना द्रुतगती रेल्वेमार्ग ह्या विमानतळावरूनच धावतो.
एका अहवालानुसार अब्दुल अजीज विमानतळ हा एकेकाळी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वाईट विमानतळ होता.
किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
या विषयावर तज्ञ बना.