टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ

टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Toronto Pearson International Airport) (आहसंवि: YYZ, आप्रविको: CYYZ) हा कॅनडा देशामधील सर्वात मोठा व टोरॉंटो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ टोरॉंटो शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर मिसिसागा ह्या भागात स्थित आहे. १९३७ साली बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाला कॅनडाचा १४वा पंतप्रधान लेस्टर बी. पियरसन ह्याचे नाव देण्यात आले. कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडाचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

२०१६ साली ४.४३ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा पीयर्सन विमानतळ जगातील ३५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत पीयर्सन विमानतळ उत्तर अमेरिकेमध्ये न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →