बीजिंग—शांघाय द्रुतगती रेल्वे (चिनी: 京沪高速铁路; जिंगजू द्रुतगती रेल्वे) हा चीन देशामधील एक प्रमुख द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. १,३१८ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग चीनची राजधानी बीजिंगला दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या शांघायसोबत जोडतो. ह्या रेल्वेमार्गाचे बांघकाम २००८ मध्ये सुरू झाले व ३० जून २०११ रोजी ह्या मार्गावरील पहिली रेल्वेगाडी धावली.
प्रवासी संख्येच्या दृष्टीने बीजिंग-शांघाय मार्ग जगातील सर्वात वर्दळीचा असून २०१९ साली २१ कोटी प्रवाशांनी ह्या रेल्वेने प्रवास केला. ह्या मार्गावर ३५० किमी/तास इतक्या कमाल तर २९२ किमी/तास इतक्या सरासरी वेगाने धावणारी द्रुतगती रेल्वे बिजिंग ते शांघाय दरम्यानचे १३०२ किमी अंतर ४ तास १८ मिनिटांत पार करते. आजच्या घडीला ह्या मार्गावर दररोज सुमारे ९० गाड्या धावतात.
बीजिंग–शांघाय द्रुतगती रेल्वे
या विषयावर तज्ञ बना.