हडपसर विधानसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

हडपसर विधानसभा मतदारसंघ - २१३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार हडपसर मतदारसंघात पुणे शहर तालुक्यातील येरवडा महसूल मंडळातील मुंढवा सझा ( पुणे महानगरपालिका वॉर्ड क्र. १३०) आणि पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१७, १९ ते २३, २६, १३१ ते १३४, १३७ ते १३९ यांचा समावेश होतो. हडपसर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन विठ्ठल तुपे (पाटील) हे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →