भायखळा विधानसभा मतदारसंघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भायखळा विधानसभा मतदारसंघ - १८४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार भायखळा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ५२२ माझगांव, जनगणना वॉर्ड क्र. ५२३- ताडवाडी, जनगणना वॉर्ड क्र. ५२४ - १ ला नागपाडा आणि जनगणना वॉर्ड क्र. ५२७ - भायखळा यांचा समावेश होतो. भायखळा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिवसेनेचे श्रीमती यामिनी यशवंत जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →