भोसरी विधानसभा मतदारसंघ - २०७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार भोसरी मतदारसंघात हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते १२, १९ ते ३०, ५९, ६०, ८० ते ८६ यांचा समावेश होतो. भोसरी हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय जनता पक्षाचे महेश (दादा) किसन लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?