माजलगाव विधानसभा मतदारसंघ - २२९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार माजलगाव मतदारसंघात बीड जिल्ह्यातील धारूर आणि वडवणी ही तालुके आणि माजलगांव तालुक्यातील किट्टी आडगांव, मंजरथ,गंगामसला, नित्रुड, दिंदूड, माजलगांव ही महसूल मंडळे आणि माजलगांव नगरपालिका क्षेत्राचा व राजेवाडी ग्रामपंचायत क्षेत्राचा समावेश होतो. माजलगाव हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. प्रकाश सुंदरराव सोळंके हे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
माजलगाव विधानसभा मतदारसंघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.