मागाठाणे विधानसभा मतदारसंघ - १५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मागाठाणे मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १७७३, १८७३ आणि वॉर्ड क्र. १६६८ मधील इन्युमरेशन ब्लॉक २१३ ते ३५६, ४८२ ते ५०१ आणि ५१९ ते ५२५ समावेश होतो. मागाठाणे हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
शिवसेनेचे प्रकाश राजाराम सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
मागाठाणे विधानसभा मतदारसंघ
या विषयातील रहस्ये उलगडा.