पुरंदर विधानसभा मतदारसंघ - २०२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार पुरंदर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १. पुरंदर तालुका, २. हवेली तालुक्यातील हडपसर महसूल मंडळ (पुणे महानगरपालिकेतील प्रभाग म्हणून गणले गेलेले क्षेत्र वगळून), हडपसर महसूल मंडळातील पिसोली गांव, (वॉर्ड क्र. १३५, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील उंद्री गांव, (वॉर्ड क्र. १३६, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील आंबेगांव बुद्रुक. गांव, (वॉर्ड क्र. १४१, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील आंबेगांव खुर्द गांव, (वॉर्ड क्र. १४२, पुणे महानगरपालिका) यांचा समावेश होतो. पुरंदर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.
शिवसेनेचे विजयबापू शिवतारे हे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
पुरंदर विधानसभा मतदारसंघ
या विषयावर तज्ञ बना.