वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ - २०८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार वडगाव शेरी मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते १५, ६४ ते ६८, १२५ ते १२९ आणि हवेली तालुक्यातील कळस महसूल मंडळ ( पुणे महानगरपालिका हददीत समाविष्ट करण्यात आलेले क्षेत्र वगळता) समावेश होतो. वडगाव शेरी हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बापूसाहेब तुकाराम पठारे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →