स्वीडन क्रिकेट संघाने चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान फिनलंडचा दौरा केला. स्वीडन आणि फिनलंड मधील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका होती. आठवड्याभरापूर्वीच डेन्मार्कचा दौरा केल्यानंतर लगेचच स्वीडनचा संघ फिनलंड मध्ये दाखल झाला. सर्व सामने केरावा मधील केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे झाले. दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेट खेळाडू जाँटी ऱ्होड्स यांना स्वीडन क्रिकेट बोर्डाने स्वीडनचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.
पहिल्या दिवशी दोन्ही सामने जिंकत फिनलंडने मालिकेत २-० ने आघाडी घेतली. परंतु दुसऱ्या दिवशीचे दोन्ही सामने स्वीडनने जिंकले. तथापि चार सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
स्वीडन क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२१
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.