स्वीडन क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान डेन्मार्कचा दौरा केला. या दौऱ्यात स्वीडनने आपले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. डेन्मार्कने या मालिकेद्वारे २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेसाठी सराव केला. सर्व सामने ब्रोंडबाय मधील सॅवहोल्म पार्क येथे झाले. दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेट खेळाडू जाँटी ऱ्होड्स यांना स्वीडन क्रिकेट बोर्डाने स्वीडनचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.
डेन्मार्कने मालिका २-१ ने जिंकली.
डेन्मार्कविरुद्धची मालिका संपताच स्वीडन चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडला रवाना झाला.
स्वीडन क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा, २०२१
या विषयातील रहस्ये उलगडा.