एस्टोनिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडाचा दौरा केला. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती. पहिला सामना फिनलंडने २३ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात देखील ११ धावांनी विजय मिळवत फिनलंडने ट्वेंटी२० मालिका २-० अशी जिंकली. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस्टोनिया क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२२
या विषयातील रहस्ये उलगडा.