स्विस आंतरराष्ट्रीय एर लाइन्स

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

स्विस आंतरराष्ट्रीय एर लाइन्स

स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स (Swiss International Air Lines) ही स्वित्झर्लंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. झ्युरिकजवळील झ्युरिक विमानतळावर प्रमुख तळ असलेली स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स २००६ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. १९३१ साली स्थापन झालेल्या व २००२ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या स्विसएरची पुनर्रचना करून २००२ साली आजची स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००७ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सला विकत घेतले.

सध्या स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सद्वारे जगातील १०४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →