स्वाभिमानी शेतकरी संघटना हा एक भारतातील राजकीय पक्ष असून महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक दबावगट म्हणून कार्यरत आहे.
या पक्षाचे एकमेव खासदार मा. खासदार राजू शेट्टी आहेत.
हा पक्ष शेतकरी संघटना (स्वाभिमानी) अथवा 'स्वाभिमानी पक्ष' (SSS) या नावाने देखील ओळखला जातो. मुळ पक्ष शरद अनंत जोशी यांनी स्थापन केलेल्या दबावगटातून निर्माण झाला.
याचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजू शेट्टी आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे हे आहेत, तर
स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे आहेत.
स्वाभिमानी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिकाताई किशोर ढगे आहेत.
स्वाभिमानी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे आहेत.
हा विशेषतः महाराष्ट्रात सक्रिय आहे.
तसेच स्वाभिमानी विद्यार्थी परिषद देखील आहे. त्याची स्थापना 2015 रोजी झाली आहे.
स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अमोल हिप्परगे आहेत.
राज्य उपाध्यक्ष शिवाजी शिंदे व शर्मिला येवले या आहेत.
स्वाभिमानी पक्ष
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.