शेतकरी कामगार पक्ष

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शेतकरी कामगार पक्ष

भारतीय शेतकरी कामगार पक्ष ( भारतीय शेकाप) हा एक महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे.



आमदार भाई जयंत पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत.

ते महाराष्ट्र विधान परिषदेवर सलग ३ वेळा निवडून गेले आहेत, तर पक्षाचे आमदार भाई बाळाराम पाटील हेही कोकण शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेत गेले आहेत.

पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख(सांगोला), भाई विवेक पाटील (पनवेल-उरण), सुभाष पाटील(अलिबाग), भाई धैर्यशील पाटील (पेण) हे विधानसभेचे आमदार आहेत. भाई गणपतराव देशमुख हे केव्हापासूनतरी ५० वर्षे पक्षाचे काम करत आहेत, ते १९६२ पासून (केव्हापर्यंत?) विधानसभेवर निवडून येत आहेत. रायगड जिल्हा परिषदेवर शेकापचेच वर्चस्व गेली (केव्हापासून?) अनेक वर्षे आहे

२०१७ साली, महाराष्ट्रामध्ये पक्षाचे ४ विधानसभा सदस्य, १ विधान परिषद सदस्य आहेत. तसेच रायगड जिल्हा परिषद तसेच पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समितीवर शेकापची सत्ता आहे. रायगडसह नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर या ५ जिल्हा परिषदांमध्ये पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत.अलिबाग, काटोल,बिलोली, इत्यादी नगरपरिषद शेकापच्या वर्चस्वाखाली आहेत, तसेच खोपोली, पनवेलमध्ये पक्षाचे नगरसेवक आहेत. (२०२०ची स्थिती?)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →