गणपतराव देशमुख

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गणपतराव अण्णासाहेब देशमुख (१० ऑगस्ट १९२६ - ३० जुलै २०२१) हे एक भारतीय राजकारणी आणि डाव्या विचारसरणीचे नेते होते होते. महाराष्ट्र विधानसभेवर ५४ वर्षे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. त्यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने "आबासाहेब" म्हणत. समानतेच्या तत्त्वांसह ते आदर्श व्यक्ती मानले जायचे. शेतकरी आणि कामगारांकडून त्यांना भाई म्हणले जात असे. गरीब, महिला, मागासलेले, शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी अनेक लढाया लढल्या. ते नेहमी राज्य वाहतूक वापरत आले, त्यामुळे त्यांना लालपरीचा आमदार म्हटले गेले.



सर्वाधिक वेळा (11) आमदार होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील राजकारणी होते. सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२पासून अनेक दशके ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले. महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार असण्याचा मान मिळालेल्या गणपतराव देशमुख यांनी अकरा वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून अकरा (११) वेळेस निवडून आले.



तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी हे १० वेळेस विजयी झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →