सांगोला विधानसभा मतदारसंघ - २५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ हा अराखीव आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचननुसार, या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी महसूल मंडळाचा समावेश होतो.
हा मतदारसंघ भारतीय लोकसभेच्या माढा मतदारसंघाचा भाग आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस आणि साताऱ्यातील फलटण आणि माण या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो.
शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
सांगोला विधानसभा मतदारसंघ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?