माढा विधानसभा मतदारसंघ - २४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याच्या १. माढा तालुक्यातील टेंभूर्णी, मोडनिंब, लील, माढा आणि डारफल ही महसूल मंडळे, २. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोळी, करकंब आणि तुंगाट ही महसूल मंडळे आणि ३. माळशिरस तालुक्यातील महाळुंग महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो. माढा हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!