शिरूर विधानसभा मतदारसंघ - १९८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार शिरूर मतदारसंघात पुणे जिल्ह्याच्या १. शिरुर तालुक्यातील न्हावरे, वडगांव रासाई आणि तळेगांव ढमढेरे ही महसूल मंडळे आणि शिरुर महसूल मंडळातील शिरुर सझा आणि करंजवणे सझा आणि शिरुर नगरपालिका, २. हवेली तालुक्यातील वाघोली आणि उरळी कांचन ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. शिरूर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर आबा कटके हे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
शिरूर विधानसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!