माळशिरस विधानसभा मतदारसंघ - २५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार माळशिरस मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहीगांव, नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस, अकलूज, वेळापूर आणि पिलीव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. माळशिरस हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ
या विषयावर तज्ञ बना.