नितीन गडकरी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदार संघातून २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.

ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. २६ मे २०१४ला मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि. २९ मे २०१४ रोजी स्वीकारला.

यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →