बसवराज माधवराव पाटील (English - Basavraj Madhavrao Patil) (जन्म २३ एप्रिल १९५७) हे भारतीय जनता पार्टी पक्षाचे एक भारतीय राजकारणी आहेत. बसवराज पाटील हे मूळचे मुरुम, उमरगा तालुक्यातील ( धाराशिव) आहेत. ते १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत उमरगा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडुण आले होते. १९९९-२००४ मध्ये ते महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झालेले ते स्थायी मंत्री होते. पुन्हा ते २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडुण गेले. २०१९च्या निवडणुकीत ते औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभूत झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बसवराज माधवराव पाटील
थोडक्यात पण महत्त्वाचे.