विजयसिंह मोहिते

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

विजयसिंह मोहिते

विजयसिंह मोहिते-पाटील (१२ जून १९४४) हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील एक राजकारणी आहेत. विजयदादा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. २००३-०४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे ६ वे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मोहिते-पाटील हे महाराष्ट्र विधानसभेवर १९८० ते २००९ दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले होते. त्यांनी २५ वर्षे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री म्हणून काम केले आहे.



सहकारमहर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांचे ते पुत्र आहेत. त्यांचे मोहिते पाटील घराणे हे राजकीयदृष्ट्या खूप प्रभावी मानले जाते.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते-पाटील ह्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत ह्यांचा सुमारे २५,००० मतांनी पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →