१२९०३ /१२९०४ गोल्डन टेम्पल मेल ही भारतीय रेल्वेची एक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेगाडी आहे. ही गाडी रोज महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल (MMCT) आणि पंजाबमधील अमृतसर जंक्शन (ASR) दरम्यान धावते. या गाडीला अमृतसर मधील सुवर्ण मंदिराचे नाव दिले गेले आहे. या गाडीला १९२८ ते १९९६ दरम्यान या काळात ''फ्रंटियर मेल'' असे नाव होते. भारताच्या फाळणीपूर्वी ही गाडी मुंबईतील बॅलार्ड पियर पासून सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर शहरापर्यंत धावत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वर्ण मंदिर मेल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.