अमरावती एक्सप्रेस

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अमरावती एक्सप्रेस

भारतीय रेल्वेकडून दोन ठिकाणाहून सेवा दिल्या जाणा-या गाडीला अमरावती एक्स्रपेस असे म्हणतात.

डिसेंबर २०१२ रोजी या सेवा खालीलप्रमाणे आहेत.



१७२२५ विजयवाडा – हुबळी अमरावती एक्स्रपेस

१७२२६ हुबळी – विजयवाडा अमरावती एक्स्रपेस

दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागाकडून कार्यान्वित केली जाणारी ही सेवा आठवडयातून तीनदा वरील मार्गावरून दिली जाते. ही गाडी भारताच्या दक्षिण भागामधून - आंध्र प्रदेशामधून गोव्यापर्यंत जाते.



१८०४७ हावडा – वास्को दा गामा अमरावती एक्सप्रेस

१८०४८ वास्को द गामा – हावडा अमरावती एक्सप्रेस

ही सेवा आठवडयातून चार वेळा वरील मार्गावरून दिली जाते. विजयवाडा, गुंटाकाळ, हुबळी, मडगांव या मार्गावरून ही गाडी धावते. दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरागपूर विभागाकडून ही सेवा कार्यान्वित केली जाते. पश्चिम बंगालमधील ओरीसा आणि भारताच्या पूर्वेकडील आंध्र प्रदेशकडून कर्नाटक आणि दक्षिण - पश्चिमेकडील गोव्यापर्यंत ही गाडी धावते.

आंध्रप्रदेशामधील शहरांमध्ये आणि गुंटुर, नारासरोपेट, कुंम्बुम, गिड्डारुला, नंदयाल, महानंदी, गुंटाकाळ आणि बेलारी आणि आजूबाजूला राहणा-या रहिवाशांमध्ये ही गाडी खुप लोकप्रिय झालेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →