स्त्रीवादी सिद्धांकन हे स्त्रीवादामधील महत्त्वाच्या मांडणीचे सैद्धांतिक स्वरूप आहे. लिंगभाव आधारित केली जाणारी विषमता समजून घेऊन त्याचे विश्लेषण करणे हे त्याचे उद्दिष्ट असते. स्त्रीवाद हा ज्याप्रमाणे एकच एक नसतो तर स्त्रीवादाचे विविध प्रवाह असतात; त्याचप्रमाणे विभिन्न स्त्रीवादांमधून वेगवेगळे स्त्रीवादी सिद्धांकन निर्माण झालेले आहे. प्रमुखप्रवाही स्त्रीवाद हा परीघावर असणाऱ्या सामाजिक समूहांना सामावून घेणारा अथवा त्यातील स्त्रियांचे अनुभव समाविष्ट करणारा असेलच असे नाही उदा. भारतातील प्रमुखप्रवाही स्त्रीवादाने दलित स्त्रियांच्या प्रश्नांची अनेक काळापर्यंत दखल घेतली नव्हती. त्याचप्रमाणे पाश्चात्य जगातील प्रमुखप्रवाही स्त्रीवादामध्ये काळ्या समूहासारख्या परीघावर असणाऱ्या स्त्रियांच्या अनुभवांचा प्रारंभीच्या काळात समावेश करण्यात आला नव्हता. बेल हूक्स या अमेरिकेतील स्त्रीवादी लेखिका त्यांच्या फेमिनिस्ट थियरी : फ्रॉम मार्जिन टू सेंटरया पुस्तकामधून वरील संदर्भात मांडणी करतात. स्त्रीवादी सिद्धांकन हे परिघावरील असणाऱ्या व्यक्ती कशाप्रकारे निर्माण करू शकतात याचा शक्यता नमूद करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्त्रीवादी सिद्धांकन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.