स्त्रीवादी सिद्धांकन निर्माण करणाऱ्यामध्ये विविध स्त्रीवादी विचारप्रवाहांचे योगदान आहे. सदर पुस्तक फेमिनिस्ट थॉट : अ मोर कॉम्प्रिहेन्सिंव इंट्रॉडक्शन याच्या आजतागायत चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. यामध्ये विविध स्त्रीवादी विचारप्रवाहांची ओळख करून दिली आहे. स्त्रीवादाचे विविध विचारप्रवाह हे काळाच्या भिन्न टप्प्यांवर उदयाला आले. वेगवेगळ्या स्त्रीवादी प्रवाहांनी आपापल्या परिप्रेक्ष्यातून स्त्रीवादी सिद्धांकनाची निर्मिती केली आहे. लिंगभाव, पितृसत्ता, लैंगिकता, सामाजिक व्यवस्था अशा महत्त्वाच्या संकल्पनांची चिकित्सा करण्याचे काम स्त्रीवादी सिद्धांकनातून झाले. स्त्रीवादी चळवळ, महत्त्वाचे असे तत्कालीन स्त्रीवादी लेखन यांचा देखील आढावा स्त्रीवादी सिद्धांकनाच्या अनुषंगाने घेतला आहे.
पुस्तकाच्या लेखिका रोझमेरी टॉंग या स्त्रीवादी लेखिका असून १९७० च्या दशकापासून त्यांनी स्त्रीवादी विचार, सिद्धांकन आणि बायो-एथिक्स या ज्ञानक्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. यासोबतच स्त्रिया, त्यांचे आरोग्य, आरोग्य विषयक सार्वजनिक धोरणे आणि जिव-वैद्यकशास्त्र अशा महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे काम आहे.
फेमिनिस्ट थॉट : अ मोअर कॉम्प्रिहेन्सिंग इंट्रॉडक्शन (पुस्तक)
थोडक्यात पण महत्त्वाचे.