सोत्शी

या विषयावर तज्ञ बना.

सोत्शी

सोत्शी (रशियन: Сочи; लेखनभेदः सोची) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्राय मधील एक शहर आहे. सोत्शी शहर जॉर्जिया देशाच्या अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाच्या सीमेजवळ कॉकासस पर्वतरांगेत व काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सोत्शी शहराची लोकसंख्या ३.४३ लाख इतकी होती.

२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे सोची हे यजमान शहर आहे. तसेच २०१४ सालापासून फॉर्म्युला वनची रशियन ग्रांप्री सोची येथे खेळवली जाईल. २०१८ फिफा विश्वचषकासाठीच्या यजमान शहरांमध्ये सोचीचा समावेश केला गेला आहे.

सोत्शी कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. रशियामधील इतर शहरांच्या तुलनेत येथील हवामान सौम्य असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →