२०१४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची २२वी आवृत्ती आहे. ही स्पर्धा ७ ते फेब्रुवारी २३ दरम्यान रशिया देशाच्या क्रास्नोदर क्रायमधील सोत्शी ह्या शहरामध्ये खेळवली जात आहे.
ह्या स्पर्धेसाठी सोत्शीची निवड ४ जुलै २००७ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ग्वातेमाला सिटी येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. यजमानपदासाठी ऑस्ट्रियामधील जाल्त्सबुर्ग व दक्षिण कोरियामधील प्याँगचँग ही इतर शहरे उत्सुक होती. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियामध्ये खेळवली जाणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे.
ह्या स्पर्धेसाठी रशियामधील काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर संपूर्णपणे नवीन क्रीडा संकूल बांधले गेले आहे. ह्या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा (रेल्वे, महामार्ग, विमानतळ) सुधारण्यासाठी तसेच अनेक सोयी नव्याने बांधण्यासाठी एकूण ५१ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च आला आहे. सोत्शी २०१४ ही आजवरच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक क्रीडा स्पर्धा आहे.
२०१४ हिवाळी ऑलिंपिक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.