काबार्दिनो-बाल्कार प्रजासत्ताक (रशियन: Кабарди́но-Балка́рская Респу́блика; काबार्दियन: Къэбэрдей-Балъкъэр Республикэ; काराचाय-बाल्कर: Къабарты-Малкъар Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात कॉकेशस प्रदेशात जॉर्जिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. कॉकासस पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या प्रदेशाचा मोठा भाग डोंगराळ आहे.
एल्ब्रुस पर्वत हा युरोपामधील सर्वात उंच पर्वत (शिखर उंची: १८,५१० फूट) काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारियाच्या सीमेवर स्थित आहे.
काबार्दिनो-बाल्कारिया
या विषयावर तज्ञ बना.