कोमी प्रजासत्ताक (रशियन: Республика Коми; कोमी: Коми Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या उत्तर-पूर्व भागात उरल पर्वतरांगेच्या पश्चिमेस वसले आहे. येथील ७० टक्के भूभाग जंगलाने तर १५ टक्के भाग दलदलीने व्यापला आहे. कोमीमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.
येथील तैगा प्रदेशाला १९९५ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले.
कोमी प्रजासत्ताक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!