बुर्यातिया

या विषयातील रहस्ये उलगडा.

बुर्यातिया

बुर्यातिया प्रजासत्ताक (रशियन: Республика Бурятия, रेस्पुब्लिका बुर्यातिया; बुर्यात: Буряад Республика) हे रशियाच्या संघातील २१ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक आहे. मंगोलियाच्या उत्तरेस वसलेल्या या प्रजासत्ताकाची राजधानी उलान-उदे येथे आहे. बैकाल हे मोठे गोड्या पाण्याचे सरोवर बुर्यातियाच्या पश्चिमेस स्थित आहे.

बुर्यातियाची लोकसंख्या २०१० साली ९.७२ लाख असून येथील ६० टक्के लोक रशियन तर ३० टक्के लोक बुर्यात वंशाचे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →