क्रास्नोदर क्राय (रशियन: Краснодарский край) हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. उत्तर कॉकेशस प्रदेशात वसलेल्या क्रास्नोदर क्रायच्या पश्चिमेस अझोवचा समुद्र, नैऋत्येस काळा समुद्र तर दक्षिणेस जॉर्जिया देशाचा अबखाझिया हा फुटीरवादी प्रदेश आहेत. अझोवच्या समुद्राच्या पलिकडे युक्रेनचे क्राइमिया हे स्वायत्त प्रजासत्ताक वसले आहे. अदिगेया प्रजासत्ताक हे रशियाच्या २१ पैकी एक प्रजासत्ताक पूर्णपणे क्रास्नोदर क्रायच्या अंतर्गत आहे.
क्रास्नोदर क्रायमधील सोत्शी हे शहर २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमान शहर असेल. तसेच २०१८ फिफा विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या ११ शहरांमध्ये सोचीचा समावेश केला गेला आहे.
क्रास्नोदर क्राय
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.