कॉकेशस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कॉकेशस

कॉकासस (आर्मेनियन: Կովկաս, अझरबैजानी: Qafqaz, जॉर्जियन: კავკასია, रशियन: Кавка́з, ओसेटिक: Кавказ, चेचन: Кавказ) हा युरोप व आशिया खंडांच्या सीमेवरील एक भौगोलिक प्रदेश आहे. कॉकासस पर्वतरांग ह्याच प्रदेशामध्ये आहे.



कॉकाससचे उत्तर कॉकासस व दक्षिण कॉकासस हे दोन विभाग मानले जातात.



उत्तर कॉकाससः ह्या भागात रशियाच्या खालील प्रांतांचा समावेश होतो:

उत्तर ओसेथिया-एलैनिया प्रजासत्ताक

चेचन्या

इंगुशेतिया

काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक

दागिस्तान प्रजासत्ताक

एडिजिया प्रजासत्ताक

काराचेय-चेर्केशिया प्रजासत्ताक

क्रॅस्नोदर क्राय

स्ताव्रोपोल क्राय

दक्षिण कॉकाससः ह्या भागात खालील देशांचा समावेश केला जातो:

आर्मेनिया

अझरबैजान (नागोर्नो-काराबाख धरून)

जॉर्जिया (दक्षिण ओसेशिया व अबखाझिया धरून)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →