सॅली मार्गारेट फील्ड (६ नोव्हेंबर १९४६) ही अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. पडद्यावर आणि रंगमंचावर तिच्या विस्तृत कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिला तिच्या पाच दशकांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ह्या पुरस्कारांमध्ये दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि तीन प्राइमटाइम एम्मी पुरस्कारांचा समावेश आहे, आणि एक टोनी पुरस्कार आणि दोन ब्रिटिश अकादमी (बाफ्टा) पुरस्कारांसाठी नामांकन देखील मिळाले आहे. तिला २०१४ मध्ये हॉलीवूड वॉक ऑफ फेम, २०१४ मध्ये नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स, २०१९ मध्ये केनेडी सेंटर ऑनर आणि २०२३ मध्ये स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे.
फील्डने दूरचित्रवाणीवर तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली ज्यात कॉमेडी मालिका गिजेट (१९६५-१९६६), द फ्लाइंग नन (१९६७-१९७०), आणि द गर्ल विथ समथिंग एक्स्ट्रा (१९७३-१९७४) मध्ये अभिनय केला. तिला एनबीसी दूरचित्रवाणी चित्रपट सिबिल (१९७६) साठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला. तिचे चित्रपट पदार्पण मून पायलट (१९६२) मध्ये अतिरिक्त भूमीकेत झाले होते. त्यानंतर द वे वेस्ट (१९६७), स्टे हंग्री (१९७६), स्मोकी अँड द बँडिट (१९७७), हीरोज (१९७७), द एंड (१९७८), आणि हूपर (१९७८) मध्ये तिने काम केले होते. तिने नॉर्मा रे (१९७९) आणि प्लेसेस इन द हार्ट (१९८४) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे दोन अकादमी पुरस्कार जिंकले. स्मोकी अँड द बँडिट २ (१९८०), अब्सेन्स ऑफ मॅलिस (१९८१), किस मी गुडबाय (१९८२), मर्फीज रोमान्स (१९८५), स्टील मॅग्नोलियास (१९८९), सोपडीश (१९९१), मिसेस डाउटफायर (१९९३) आणि फॉरेस्ट गंप (१९९४) या तिच्या उल्लेखनीय भूमिकांचा समावेश आहे.
२००० च्या दशकात, फील्ड एनबीसी वैद्यकीय नाटक ईआर मध्ये भूमिका घेऊन दूरचित्रवाणीवर परतली, ज्यासाठी तिने २००१ मध्ये ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्रीचा प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. एबीसी नाटक मालिका ब्रदर्स अँड सिस्टर्स (२००६-२०११) मधील नोरा वॉकरच्या भूमिकेसाठी, फील्डने ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. तिने लिंकन (२०१२) मध्ये मेरी टॉड लिंकन (अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनची पत्नी) यांची भूमिका साकारली, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अकादमी पुरस्काराचे नामांकन मिळाला होते. द अमेझिंग स्पायडर-मॅन (२०१२) आणि त्याच्या २०१४ च्या पुढील भागामध्ये तिने आंट मेची भूमिका साकारली होती. तिच्या इतर भूमिकांमध्ये हेलॉ, माय नेम इज डॉरीस (२०१५) आणि ८० फॅर ब्रॅडी (२०२३), तसेच नेटफ्लिक्स मर्यादित मालिका मॅनियाक (२०१८) मधील चित्रपटांचा समावेश आहे.
एडवर्ड अल्बीच्या मूळ ब्रॉडवे प्रॉडक्शनमध्ये मर्सिडीज रुहेलची जागा घेऊन तिने व्यावसायिक रंगमंचावर द गोट ऑर हू इज सिल्व्हिया? (२००२) या नाटकातून पदार्पण केले. फिल्ड १५ वर्षांच्या अनुपस्थितीनंतर २०१७ मध्ये टेनेसी विल्यम्सच्या द ग्लास मेनेजरी या नाटकाच्या पुनरुज्जीवनासह रंगमंचावर परतली, ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. २०१९ मध्ये आर्थर मिलरच्या ऑल माय सन्स या नाटकाच्या पुनरुज्जीवनातून तिने वेस्ट एंड थिएटरमध्ये पदार्पण केले.
सॅली फील्ड
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.