मॅगी जिलेनहाल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मॅगी जिलेनहाल

मार्गालिट रुथ "मॅगी" जिलेनहाल (जन्म १६ नोव्हेंबर १९७७) एक अमेरिकन अभिनेत्री आणि चित्रपट निर्माता आहे. ती स्वीडिश मूळाच्या जिलेनहाल कुटुंबाचा एक भाग आहे. चित्रपट निर्माते स्टीफन जिलेनहाल आणि नाओमी आक्स यांची ती मुलगी आहे आणि अभिनेता जेक जिलेनहाल यांची मोठी बहीण आहे.

तिने किशोरवयातच तिच्या वडिलांच्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांसह तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि तिच्या भावासोबत डॉनी डार्को (२००१) मध्ये ती दिसली. त्यानंतर ती कन्फेशन्स ऑफ ए डेंजरस माइंड (२००२) आणि मोना लिसा स्माइल (२००३) मध्ये काम केले. कामुक हास्य-नाट्य सेक्रेटरी (२००२) आणि शेरीबेबी (२००६) या तिच्या प्रमुख अभिनयासाठी जिलेनहालला समीक्षकांची प्रशंसा मिळाली, व प्रत्येकाने तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन मिळवून दिले. द डार्क नाइट (२००८) या सुपरहिरो चित्रपटात रॅचेल डावेसच्या भूमिकेसाठी तिला व्यापक मान्यता मिळाली.

क्रेझी हार्ट (२००९) मध्ये एकट्या आईच्या तिच्या अभिनयासाठी, तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. २०२१ मध्ये, तिने द लॉस्ट डॉटर या मनोवैज्ञानिक नाटकाद्वारे लेखन आणि दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्यासाठी तिने व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार जिंकला आणि सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

ती २००० पासून पाच नाटकांमध्ये दिसली आहे, ज्यात तिचे ब्रॉडवे पदार्पण द रिअल थिंगच्या पुनरुज्जीवनामधुन झाले. तिने अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे, ज्यात बीबीसी राजकीय-थरारपट द ऑनरेबल वुमनचा समावेश आहे. तिच्या अभिनयासाठी, तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. २००९ पासून अभिनेता पीटर सार्सगार्डसोबत तिचे लग्न झाले आहे आणि त्यांना दोन मुली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →