मॅगी स्मिथ

या विषयातील रहस्ये उलगडा.

मॅगी स्मिथ

डेम मार्गारेट नॅटली स्मिथ (२८ डिसेंबर १९३४ - २७ सप्टेंबर २०२४) एक इंग्रजी अभिनेत्री होती जी मॅगी स्मिथ म्हणून ओळखली जाते. विनोदी भूमिकांमध्ये तिच्या थट्टेखोर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिने सात दशकांहून अधिक काळ रंगमंचावर आणि पडद्यावर विस्तृत कारकीर्द केली. ती ब्रिटनमधील सर्वात ओळखण्यायोग्य आणि विपुल अभिनेत्रींपैकी एक होती. तिला दोन ऑस्कर पुरस्कार, पाच बाफ्टा पुरस्कार, चार एमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि एक टोनी पुरस्कार यासह अनेक इतर पुरस्कार मिळाले होते. ती अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे.

स्मिथने १९५२ मध्ये ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये काम करून विद्यार्थी म्हणून तिच्या नाटकाच्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि १९५६ मध्ये ब्रॉडवेवर व्यावसायिक पदार्पण केले. पुढील दशकांमध्ये, स्मिथने नॅशनल थिएटर आणि रॉयल शेक्सपियर कंपनीसाठी काम करत, जुडी डेंचसोबत सर्वात लक्षणीय ब्रिटिश थिएटर कलाकार म्हणून स्वतःची स्थापना केली. ब्रॉडवेवर, तिला नोएल कॉवर्डच्या प्रायव्हेट लाइव्ह्स (१९७५) आणि डेव्हिड हेअरच्या नाईट अँड डे (१९७९) साठी टोनी पुरस्कार नामांकन मिळाले आणि लेटीस अँड लोव्हेज (१९९०) च्या नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला.

स्मिथने १९५८ मध्ये नोव्हेअर टू गो या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६९ मध्ये द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडीच्या शीर्षक भूमिकेतील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आणि तिने कॅलिफोर्निया सूट (१९७८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देखील जिंकला. ऑथेलो (१९६५), ट्रॅव्हल्स विथ माय आंट (१९७२), ए रूम विथ अ व्यू (१९८५), आणि गॉस्फोर्ड पार्क (२००१) मधील तिच्या भूमिकांसाठी तिची इतर ऑस्कर नामांकनं होती. इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये डेथ ऑन द नाईल (१९७८), हुक (१९९१), सिस्टर ऍक्ट (१९९२), द सीक्रेट गार्डन (१९९३), हॅरी पॉटर शृंखला (२००१-२०११), द बेस्ट एक्सोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०१२) आणि द लेडी इन द व्हॅन (२०१५) यांचा समावेश होतो.

स्मिथ तिच्या संपूर्ण कारकिर्दीत टेलिव्हिजनवर तुरळकपणे दिसली आणि ब्रिटिश एतिहासीक काळातील डाउन्टन ॲबी (२०१०-२०१५) मधील तिच्या व्हायोलेट क्रॉलीच्या भूमिकेसाठी तिने प्रेक्षकांचे खास लक्ष आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. या भूमिकेमुळे तिला तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाले. यापूर्वी माय हाऊस इन उम्ब्रिया (२००३) या एचबीओच्या चित्रपटासाठी पण तिने हा पुरस्कार जिंकला होता.

तिच्या कारकिर्दीत, स्मिथला १९९३ मध्ये ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट फेलोशिप, १९९६ मध्ये बाफ्टा फेलोशिप आणि २०१० मध्ये सोसायटी ऑफ लंडन थिएटर स्पेशल अवॉर्ड यासह असंख्य मानद पुरस्कारांनी मान्यता मिळाली. स्मिथला १९९० मध्ये राणी दुसरी एलिझाबेथने तिच्या कलेतील योगदानासाठी डेम पद दिले, आणि नाटकातील सेवांसाठी २०१४ मध्ये ऑर्डर ऑफ द कंपेनियन्स ऑफ ऑनरचे सदस्यपद दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →