शर्ली बूथ (जन्म मार्जोरी फोर्ड ; ३० ऑगस्ट १८९८ – १६ ऑक्टोबर १९९२) एक अमेरिकन अभिनेत्री होती. अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळविण्याऱ्या २४ कलाकारांपैकी ती एक आहे. बूथही अकादमी पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि तीन टोनी पुरस्कार प्राप्तकर्ता होता.
प्रामुख्याने ती एक नाटक अभिनेत्री होती. बूथने १९१५ मध्ये ब्रॉडवेवर तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिला तिचा पहिला टोनी पुरस्कार १९४८ चा नाटक गुडबाय, माय फॅन्सी साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी मिळाला. तिचे सर्वात लक्षणीय यश म्हणजे लोला डेलानीच्या भुमीकेतील, कम बॅक, लिटल शेबा या नाटकात होते. त्यासाठी तिला १९५० मध्ये तिचा दुसरा टोनी पुरस्कार मिळाला. तिने १९५२ च्या चित्रपट आवृत्तीमध्ये तिच्या भूमिकेची पुनरावृत्ती करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यासाठी तिने तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला. चित्रपटांमध्ये तिचा यशस्वी प्रवेश असूनही, तिने रंगमंचावर अभिनय करण्यास प्राधान्य दिले आणि फक्त अजून चार चित्रपट केले: मेन स्ट्रीट टू बॉडवे (१९५३), अबाऊट मिसेस लेस्ली (१९५४), हॉट स्पेल (१९५८) आणि द मॅचमेकर (१९५८). कम बॅक, लिटल शेबा आणि अबाऊट मिसेस लेस्ली साठी तिला बाफ्टा पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. १९५८ च्या दोन्ही चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी न्यू यॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल पुरस्काराचे नामांकन मिळाले.
१९६१ ते १९६६ पर्यंत, तिने सिटकॉम हेझेलमध्ये शीर्षक भूमिका केली, ज्यासाठी तिने दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकले. १९६६ च्या द ग्लास मेनेजरी या दूरचित्रवाणी प्रॉडक्शनमधील तिच्या अभिनयासाठी तिची प्रशंसा झाली. १९७४ च्या ॲनिमेटेड ख्रिसमस दूरचित्रवाणी स्पेशल द इयर विदाऊट अ सांताक्लॉजमध्ये मिसेस क्लॉजचा आवाज ही तिची अंतिम भूमिका होती.
शर्ली बूथ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.