डेम व्हेनेसा रेडग्रेव्ह (जन्म ३० जानेवारी १९३७) एक इंग्रजी अभिनेत्री आहे. तिच्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, रेडग्रेव्हने अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि एक ऑलिव्हियर पुरस्कार यासह असंख्य प्रशंसा मिळवल्या आहेत. ती अभिनयाचा तिहेरी मुकुट प्राप्त करणाऱ्या काही कलाकारांपैकी एक आहे. तिला बाफ्टा फेलोशिप अवॉर्ड, गोल्डन लायन ऑनररी अवॉर्ड आणि अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समावेशासह विविध मानद पुरस्कार देखील मिळाले आहेत.
रेडग्रेव्हने १९५८ मध्ये अ टच ऑफ सन या नाटकाद्वारे रंगमंचावर अभिनयाची सुरुवात केली. १९६१ मध्ये तिने रॉयल शेक्सपियर कंपनीसोबत शेक्सपियरच्या कॉमेडी ॲज यू लाइक इटमध्ये रोझलिंडची भूमिका साकारली आणि तेव्हापासून तिने वेस्ट एंड आणि ब्रॉडवेवर असंख्य निर्मितीमध्ये भूमिका केल्या आहेत. तिने द एस्पर्न पेपर्स (१९८४) साठी रिव्हायव्हलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑलिव्हियर पुरस्कार जिंकला. तिने ए टच ऑफ द पोएट (१९८८), जॉन गॅब्रिएल बोर्कमन (१९९७), आणि द इनहेरिटन्स (२०१९) साठी ऑलिव्हियर नामांकन प्राप्त केले. लाँग डेज जर्नी टू नाईट (२००३) च्या पुनरुज्जीवनासाठी तिने नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. तिला द यीअर ऑफ मॅजिकल थिंकिंग (२००७) आणि ड्रायव्हिंग मिस डेझी (२०११) साठी टोनी नामांकन मिळाले आहे.
रेडग्रेव्हने तिच्या वडिलांच्या सोबत वैद्यकीय नाटक बिहाइंड द मास्क (१९५८) मध्ये अभिनय करून तिच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि मॉर्गन: अ सुटेबल केस फॉर ट्रीटमेंट (१९६६) या व्यंगचित्रात्मक चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. ह्यासाठी तिला सहा अकादमी पुरस्कार नामांकनांपैकी पहिले नामांकन मिळवून दिले. ज्युलिया (१९७७) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार तिला मिळाला. तिचे इतर नामांकन इसाडोरा (१९६८), मेरी, क्वीन ऑफ स्कॉट्स (१९७१), द बोस्टोनियन्स (१९८४), आणि हॉवर्ड्स एंड (१९९२) साठी होते. अ मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६६), ब्लोअप (१९६६), कॅमलोट (१९६७), द डेव्हिल्स (१९७१), मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस (१९७४), अगाथा (१९७९), प्रिक अप युअर इअर्स (१९८७), मिशन: इम्पॉसिबल (१९९६), व्हीनस (२००६), अटोनमेंट (२००७), कोरियोलनस (२०११), आणि फॉक्सकॅचर (२०१४).हे तिच्या इतर चित्रपटांपैकी आहेत.
व्हेनेसा रेडग्रेव्ह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.