निकोलेट शेरिडन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

निकोलेट शेरिडन

निकोलेट शेरीडन (जन्म २१ नोव्हेंबर १९६३) ही ब्रिटिश वंशाची अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने फॅशन मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८४ मध्ये एबीसी प्राइमटाइम सोप ऑपेरा पेपर डॉल्समध्ये भूमिका साकारली, तसेच प्रणय-हास्य चित्रपट द शुअर थिंग (१९८५) मध्ये भूमिका केली. सीबीएस प्राइमटाइम सोप ऑपेरा नॉट्स लँडिंग (१९८६-१९९३) वर पायज मॅथेसन म्हणून ती प्रसिद्ध झाली, ज्यासाठी तिला दोन सोप ऑपेरा डायजेस्ट पुरस्कार मिळाले. त्यानंतर, शेरीडन ही लकी चान्सेस (१९९०), व्हायरस (१९९५), आणि द पीपल नेक्स्ट डोर (१९९६) सह अनेक दूरचित्रवाणी चित्रपट आणि लघु मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. नॉईसेस ऑफ (१९९२), स्पाय हार्ड (१९९६), बेव्हरली हिल्स निन्जा (१९९७), आणि कोड नेम: द क्लीनर (२००७) या चित्रपटांमध्येही ती दिसली.

२००४ ते १००९ पर्यंत, शेरीडनने एबीसी टेलिव्हिजन मालिका डेस्परेट हाऊसवाइव्हजमध्ये एडी ब्रिट म्हणून काम केले, ज्यासाठी तिला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →